कु. वैष्णवी उमेश कुलकर्णी एम्.ए. (इंग्रजी) परीक्षेत शिवाजी विद्यापिठात प्रथम !

कु. वैष्णवी कुलकर्णी

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २८ जानेवारी (वार्ता.) – कु. वैष्णवी उमेश कुलकर्णी यांनी एम्.ए. (इंग्रजी) परीक्षेत शिवाजी विद्यापिठात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. वैष्णवी या दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक सौ. संगीता कुलकर्णी आणि श्री. उमेश कुलकर्णी यांच्या कन्या असून कु. वैष्णवी यासुद्धा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आहेत. त्यांच्या घरी प्रतिवर्षी प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणपादुका इंदूर (मध्यप्रदेश) येथून येतात. कु. वैष्णवी यांनी हे यश सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे.