नगरच्‍या पवित्र भूमीत होणारे धर्मांतर होऊ देणार का ? – सुरेश चव्‍हाणके, मुख्‍य संपादक, सुदर्शन न्‍यूज

नगर येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हिंदु राष्‍ट्रासाठी कृतीशील होण्‍याचा निर्धार !

दीपप्रज्‍वलन करतांना श्री. सुनील घनवट, डावीकडून सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुरेश चव्‍हाणके आणि कु. रागेश्री देशपांडे

नगर, २२ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज, त्‍यांचे पिता शहाजी राजे यांची कर्मभूमी, अहिल्‍याबाई होळकर यांची जन्‍मभूमी आणि दर्ग्‍याच्‍या ठिकाणी असणारे गणपतीचे पवित्र स्‍थान, साईबाबांची शिर्डी, ज्ञानेश्‍वरीचे लिखाण झालेले ठिकाण, शनिशिंगणापूर यांसारख्‍या पवित्रभूमीत धर्मांतर होऊ देणार का ? याचा विचार करून कृतीशील होण्‍याची वेळ आली आहे. वर्ष २०२२ मध्‍ये ७४२ ठिकाणी टिपू सुलतान आणि औरंगजेब जयंती साजरी करण्‍याच्‍या घटना घडल्‍या. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी आपण महाराष्‍ट्र सरकारकडे मागणी करतो की, जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करणार नाहीत, त्‍यांना महाराष्‍ट्रात स्‍थान देऊ नका. मुसलमानांचे अल्‍पसंख्‍यांकांचे लांगूलचालन थांबवा. केंद्र सरकारकडे मागणी करतो की, मुसलमानांचा अल्‍पसंख्‍याक दर्जा काढून घ्‍या. यासाठी रायरेश्‍वराच्‍या मंदिरात माझ्‍यासोबत शपथ घेण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहा, असे आवाहन  ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी केले. जॉगिंग पार्क मैदान, प्रोफेसर चौक, सावेडी, नगर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्‍या कु. रागेश्री देशपांडे यांनीही उपस्‍थित हिंदूंंना संबोधित केले.

नगर येथील हिंदु-राष्ट्र जागृती सभेत धर्माभिमानी हिंदू

सभास्‍थळी ढोल-ताशांच्‍या गजरात माननीय वक्‍त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला ५ सहस्रांहून अधिक हिंदूंंनी उपस्‍थिती दर्शवून ‘अब, जो हिंदु हितकी बात करेगा, जो हिंदु हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा !’ असा निर्धार केला. ज्‍या सभेची नगरकर आतुरतेने वाट पहात होते, त्‍या सभेला हिंदूंनी सहस्रोंच्‍या संख्‍येने उपस्‍थित राहून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात तन, मन, धनाने समर्पित होण्‍याचा निर्धार केला.

भ्रमणभाषचा ‘फ्‍लॅश लाईट’ लावून वक्‍त्‍यांच्‍या भाषणाला प्रतिसाद देतांना उपस्‍थित धर्माभिमानी

या सभेसाठी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्‍या गावांतील धर्माभिमानी हिंदु सहस्रोंच्‍या संख्‍येने उपस्‍थित होते. प्रारंभी श्री. उत्‍कर्ष गीते यांनी शंखनाद केला. त्‍यानंतर मान्‍यवर वक्‍त्‍यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. येथील वेदमूर्ती श्री. उपेंद्र खिस्‍तीगुरुजी, श्री. नरेंद्र खिस्‍तीगुरुजी, श्री. प्रसाद पांडवगुरुजी, श्री. सुनील जोशीगुरुजी, श्री. पियूष पुरकरगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्‍या जिल्‍हा समन्‍वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी समितीच्‍या कार्याचा आढावा मांडला.

मान्यवरांचे मार्गदर्शन !

धर्मांतर आणि हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

पुरोगामी आणि धर्मांध संघटना यांच्या विरोधानंतर पद, पक्ष, संघटना, संप्रदाय सर्व बाजूला ठेवून आपण सर्वांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंच्या संघटित शक्तीचा ‘नगर पॅटर्न सिद्ध केला आहे. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली आहे. मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर उर्वरित राष्ट्र हे ‘हिंदु राष्ट्र’ का नाही ? या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आतापासून कार्य करा. सध्या अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण चालू आहे. नगर जिल्ह्यातही सर्रासपणे गोतस्करी, गोहत्या होत आहेत. वक्फ बोर्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने भूमींवर दावा लावला आहे. या माध्यमातून लँड जिहादच चालू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी वक्फ ॲक्ट आणि वक्फ बोर्ड रहित करणे यासाठी नगरवासियांनी विरोध करायला हवा.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मशिक्षण आणि साधना आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

पुरोगामीत्वाच्या नावाखाली आपण महान हिंदु धर्मापासून दूर जात आहोत. विदेशी संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होत आहे. याउलट विदेशात भारतीय संस्कृती, परंपरा यांचे पालन करण्याचा प्रयत्न होत आहे. धर्मपालनातील कृतींमागे आध्यात्मिक, तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील धर्मशास्त्र समजून घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण घेण्यासमवेतच साधना करणे आवश्यक आहे.

भगिनींनो आपल्यातील धर्मतेज वाढवून ‘लव्ह जिहाद’ रोखा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

कु. रागेश्री देशपांडे

लव्ह जिहादने आज क्रूरतेची परिसीमा गाठली आहे. हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्यास तिचे बळजोरीने धर्मांतर केले जाते, तिचा वापर केवळ शारीरिक उपभोगासाठी केला जातो, तसेच गोमांस सेवनाची, नमाज पढण्याची सक्ती केली जाते, वेश्या व्यवसायात ढकलले जाते किंवा आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो. हे ‘जिहादी संकट’ रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणेही आवश्यक आहे. स्वतःतील काली, दुर्गा जागृत करा, धर्मतेज जागवा !

क्षणचित्रे

१. सभास्‍थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्‍यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्‍कार कक्ष उभारण्‍यात आला होता. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते.

२. श्री. सुरेश चव्‍हाणके यांचे माता-पिता श्री. खंडेराव चव्‍हाणके आणि सौ. गयाबाई चव्‍हाणके हेही या वेळी उपस्‍थित होते.

३. ‘नगर आहे हिंदूंचे, नाही कुणाच्‍या बापाचे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

४. बजरंग दलाचे स्‍वयंसेवक सभेला सुरक्षा देण्‍यासाठी स्‍वतःच्‍या गणवेशात आले होते. त्‍यांनी सभेला सुरक्षा दिली.

५. सभास्‍थळी हिंदु राष्‍ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथ अन् सात्त्विक उत्‍पादने, तसेच क्रांतीकारकांची माहिती असलेले आणि धर्माचरण कसे करावे ? यांचे फलक प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

संतांची वंदनीय उपस्‍थिती

हिंदुभूषण शाम महाराज राठोड, ह.भ.प. क्षीरसागर महाराज, ह.भ.प. दीपकनाथ महाराज,  ह.भ.प. प्रतिभाताई भोंग