देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे का ?

प्रश्न : गावातील देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे कि प्रथा ?

कौल लावण्याची कृती

उत्तर : कौल लावणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. देवळातली सात्त्विकता, मूर्तीतील सात्त्विकता, तसेच कौल लावणारे सात्त्विक आहते का, देवळात येणारे, प्रतिदिन पूजा करणारे सात्त्विक आहेत का ? एकंदर त्या मूर्तीत सात्त्विकता किती आहे यावर सगळं अवलंबून असते. कौल लावतांना बर्‍याचदा नातेवाईक, प्रश्न विचारणारे सर्व बाजूला गर्दी करून बसलेले असतात. त्यांना जर आतमध्ये न घेता त्यांची प्रश्नांची सूची घेऊन केवळ सात्त्विक लोक जर आत गेले, तर मूर्तीची सात्त्विकता, देवळातले, गाभार्‍यातले सात्त्विक वातावरण, कौल लावणारे सात्त्विक आहेत, अशा वेळेला उत्तर अचूक येण्याची शक्यता पुष्कळ जास्त असते. सात्त्विकता जेवढ्या प्रमाणात न्यून होत जाईल, तितके उत्तर अचूक येण्याचे प्रमाणही अल्प होत जाईल. देवस्थान सात्त्विक असणे, उदा. गोव्यातील शांतादुर्गा, शेगाव येथील गजानन महाराजांचे समाधीस्थान इत्यादी आणि बाकी कौल लावणारे सात्त्विक असले की, उत्तरे अचूक येतात अन् मग बुद्धीच्या पलीकडच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला निश्चित मिळू शकतात.

(अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !)

साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ Sanatan.org (सनातन डॉट ऑर्ग)

#कौल, #कौल_लावणे, कौल, कौल लावणे