बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या तोडफोड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश !

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावानजीक विवकुंड नाल्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी तोडफोड केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले असून विसापूर गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

परिस्थिती चिघळू नये; म्हणून तातडीने पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणावी, तसेच त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.