मंदसौर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान युवतीचा हिंदु युवकाशी विवाह !

मंदसौर येथे अनेक मुसलमान बनले आहेत हिंदु !

नॅन्सी गोस्वामी (पूर्वाश्रमीची नाजनीन बानो) आणि दीपक गोस्वामी

मंदसौर (मध्यप्रदेश) – येथे एका मुसलमान युवतीची ‘टीक-टॉक ॲप’च्या (व्हिडिओ बनवून प्रसारित करणार्‍या प्रणालीच्या) माध्यमातून एका हिंदु मुलाशी ओळख झाल्यानंतर तिने त्याच्याशी हिंदु परंपरेनुसार विवाह केला. नाजनीन बानो असे या युवतीचे, तर दीपक गोस्वामी असे युवकाचे नाव आहे. दोघांचा विवाह १७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी येथील गायत्री मंदिरात विधीवत् पार पडला. विवाहापूर्वी नाजनीन बानो हिने हिंदु धर्म स्वीकारला. ती मूळची मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील रहिवासी आहे. विवाहनंतर तिचे नाव नॅन्सी गोस्वामी असे ठेवण्यात आले आहे.

नाजनीन बानो हिची दीपक याच्याशी वर्ष २०१९ मध्ये ‘टीक-टॉक ॲप’च्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रथम मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. याविषयी तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला. त्यामुळे १३ मे या दिवशी ते दोघेही घरातून पळून गेले होते. तथापि दोघेही भिन्न धर्माचे असल्यामुळे विवाह करू शकत नव्हते. यानंतर युवतीने हिंदु धर्म स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली. त्यानुसार दीपकच्या वडिलांनी युवतीच्या वडिलांशी संपर्क साधून विवाह निश्चित केला.

मुस्लिम मुलगी ‘नाजनीन’ सनातन धर्म स्वीकारल्यानंतर बनली ‘नॅन्सी’ !

मंदसौर येथे आतापर्यंत अनेक मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे.

१. २७ मे या दिवशी शेख जाफर कुरेशी यांनी विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. आता त्यांचे नाव चैतन्यसिंह राजपूत असे आहे.

२. एका मुसलमान युवतीने हिंदु युवकाशी विवाह केला.

३. जोधपूर येथील इकरा यांनी इशिका बनून ९ सप्टेंबर या दिवशी मंदसौर येथील गायत्री मंदिरात विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

४. ३० सप्टेंबरला मंदसौर येथे रहाणारे महंमद निसार यांनी इस्लाम पंथ त्यागून हिंदु धर्म स्वीकारला. त्यांचे नाव आता सोनू सिंह असे आहे. त्यांनी ८ वर्षांपूर्वी एका हिंदु युवतीशी विवाह केला होता.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादविषयी चकार शब्दही न काढणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आता कंठ फुटल्यास आश्चर्य वाटू नये !