नातेवाइकाच्या मृत्यूनंतर साधिकेला त्याच्या मृत्यूत्तर प्रवासाचे दृश्य दिसणे आणि साधिकेला स्वतःच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचे दृश्य दिसल्यावर तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया सांगितल्याबद्दल कृतज्ञता वाटणे
१. मृत नातेवाइकाला सद्गती मिळण्यासाठी प्रार्थना करून नामजप करतांना ‘त्याचा सूक्ष्म देह पृथ्वीच्या पुढे जाण्यासाठी धडपडत असून त्याच्या मनातील इच्छा-आकांक्षा आणि संस्कार यांमुळे तो वर जाऊ शकत नाही’, असे जाणवणे
‘माझ्या एका नातेवाइकाचे निधन झाले’, असे मला २१.१.२०२१ या दिवशी समजले. मी त्याला सद्गती मिळण्यासाठी प्रार्थना करून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागले. त्या वेळी मला थोडा त्रास होऊ लागला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘मृत नातेवाइकाचा सूक्ष्म देह वरच्या दिशेने पृथ्वीच्या पुढे जाण्यासाठी धडपडत आहे; परंतु त्याच्या मनातील इच्छा-आकांक्षा आणि संस्कार यांमुळे तो वर जाऊ शकत नव्हता. त्रासदायक शक्ती आणि अन्य सूक्ष्म देह त्याला दाबून ठेवत आहेत.’
२. साधिकेच्या मनात स्वतःच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी विचार आल्यावर ‘तिच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकांच्या दिशेने वेगाने जाणे शक्य झाले’, असे सूक्ष्मातून दिसणे अन् ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मनावरचे संस्कार न्यून झाले’, असे जाणवणे
मला होणारा त्रास थांबवण्यासाठी मी प्रार्थना करून नामजप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझा मृत्यू झाल्यानंतर माझे काय होईल ?’ त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘मृत्यूनंतर माझा सूक्ष्म देह स्थूल देह लगेच सोडून उच्च लोकांच्या दिशेने जात आहे. याचे कारण म्हणजे मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे माझ्या मनातील स्वभावदोष अन् अहं, तसेच संस्कार यांचे प्रमाण उणावले. त्यामुळे माझ्या मनावरचे ओझे जणू न्यून झाल्याने सूक्ष्म देहाला उच्च लोकांच्या दिशेने वेगाने जाणे शक्य झाले.’
३. कृतज्ञता
मला ही अनुभूती आल्यानंतर मृत्यूची भीती वाटली नाही. माझ्या मनात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी कृतज्ञतेविना अन्य कोणतेही विचार नव्हते. आम्हाला साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. रिशिता गडोया, फोंडा, गोवा. (२६.५.२०२१)
|