गोवा येथील ‘हिंदू एकता दिंडी’त साधिकेला संतांचे अस्तित्व जाणवणे

८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त फोंडा, गोवा येथे ‘हिंदू एकता दिंडी’ काढली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या सौ. गौरी चौधरी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. गौरी चौधरी

१. ‘हिंदू एकता दिंडी’त सहभागी होण्यासाठी जातांना मनात उत्साह निर्माण झाला होता.

२. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) संगीता जाधव हे सर्व सद्गुरु आणि संत दिंडीत उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.

३. ‘हिंदू एकता दिंडी’तील वातावरणात पुष्कळ गारवा जाणवत होता.

४. बरेच दिवसांनी पुष्कळ चालले असूनही माझे पाय दुखले नाहीत.’

– सौ. गौरी चौधरी, फोंडा, गोवा. (१५.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक