हिंदु राष्ट्र स्थापनेत देशील ना रे, मला खारुताईचा वाटा ।

आज, भाद्रपद कृष्ण तृतीया (१३.९.२०२२) या दिवशी माझा वाढदिवस आहे. गेल्या वाढदिवसाच्या आधी ३ – ४ दिवस मी श्रीकृष्णाशी बोलत होते. तेव्हा वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने मला एक सुंदर कविता सुचवून जणूकाही मला भावभेटच दिली होती. त्यासाठी मी त्याच्या आणि गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी

सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !

आले एकटी, जाणारही एकटी ।
श्रीकृष्णा, दे ना रे मज लवकर मुक्ती ।। १ ।।

न राहो मज कुठलीही आस ।
लागो मज तुझ्याच चरणांचा ध्यास ।। २ ।।

‘मना’ शब्द करिता उलट होई ‘नाम’ ।
तुझी सेवा अन् भक्ती हेच माझे काम ।। ३ ।।

या जगी घट्ट असे केवळ एकच नाते ।
श्रीकृष्णा, तुझे आणि माझेच नाते ।। ४ ।।

चक्र सुख-दुःख आणि जन्म-पुनर्जन्माचे ।
असूनही ‘मी नाही’, वैशिष्ट्य या रंगमंचाचे ।। ५ ।।

प्रीतीमय श्रीकृष्णा, लागो तुझाच छंद ।
जीव-शिव एकरूपतेत मिळो ब्रह्मानंद ।। ६ ।।

श्रीकृष्णा, तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी आहेत अनेक वाटा ।
हिंदु राष्ट्र स्थापनेत देशील ना रे, मला खारुताईचा वाटा ।। ७ ।।

– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.९.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक