आजकाल अनेक जन्महिंदू सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म होऊनही धर्माचरण, तसेच साधनाही करत नाहीत. त्यासोबत हिंदु धर्म आणि मातृभूमी यांवर विविध प्रकारची आक्रमणे होत असतांना, ते त्या विरोधात कोणत्याही प्रकारची कृती न करता केवळ; ‘मी, माझे कुटुंब’ एवढाच संकुचित विचार करतात. त्यामुळे त्यांची समष्टी साधनाही होत नाही. हे जन्महिंदू पाश्चात्यांचे अंधानुकरण करत स्वतःला आधुनिक मानतात.
अशा वेळी निधर्मी लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केल्यास देव त्यांचे रक्षण करत नाही; कारण ‘न मे भक्त: प्रणश्यती ।’ नुसार देव केवळ भक्तांचे, व्यष्टी-समष्टी साधना करणार्या साधकांचे रक्षण करतो. त्यामुळे आपणही अशा स्थितीत भावनिक होण्याची आवश्यकता नसते. राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रामाणिकपणे लढणार्या हिंदूंवर आक्रमण झाल्यास त्यांच्या साहाय्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (१८.८.२०२२)