‘भारतीय कुटुंबपद्धतीनुसार मुलीचे लग्न होऊन ती तिच्या पतीच्या घरी, म्हणजे सासरी जाते. ‘सासर’ हेच तिचे घर होते. लग्न झाल्यावर तिला तेथील माणसे, घर इत्यादी सगळेच नवीन असते. मुलींना ‘या नवजीवनाशी जुळवून घेणे किती कठीण जात असेल ?’, याची कल्पनाही करणे कठीण आहे; परंतु सासरी ‘तिने कसे रहायचे, तेथे जुळवून कसे घ्यायचे’, आदी गोष्टींविषयी तिचे कुटुंबीय तिची लहानपणापासून सिद्धता करवून घेतात, तिला शिकवतात. यासंदर्भात पालकांनी ‘स्वत:च्या मुलीची लहानपणापासून कशी सिद्धता करून घेतली ? तिला कसे शिकवले’ किंवा/ तसेच मुलींनी ‘आपल्या कुटुंबियांनी आपल्याला कसे शिकवले ?’, यासंदर्भातील उदाहरणे किंवा माहिती आम्हाला खालील पत्त्यावर पाठवा. या माहितीतून इतरांना ‘मुलींना कसे घडवायचे ?’, हे शिकता येईल.’
लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्तासौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संगणकीय पत्ता : [email protected] |