नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समन्वय साधण्याच्या हेतूने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली १४ अधिकार्यांची समिती गठित केली आहे. कुंभमेळा ५ वर्षांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठक घेऊन सर्व प्रकारची प्रशासकीय सिद्धता करणे, तसेच विविध विभागांशी समन्वय साधणे यांसाठी समिती स्थापण्याची सूचना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात १ वर्षाच्या कालावधीसाठी किती क्षेत्राचे भूसंपादन करावे लागेल, मागील ३ कुंभमेळ्यांचे आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन साधूग्रामसाठी जागेचे नियोजन, आरक्षण अन् अधिग्रहण करण्याची कार्यवाही यांविषयी आढावा घेण्याची पावलेही आता तत्परतेने उचलली जाण्याची अपेक्षा आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नाशिक येथील वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वसिद्धतेसाठी १४ अधिकार्यांची समिती गठित !
नाशिक येथील वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वसिद्धतेसाठी १४ अधिकार्यांची समिती गठित !
नूतन लेख
गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाकडून माध्यान्ह आहार पुरवठादाराची अनुज्ञप्ती रहित
‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !
मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !
(म्हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav
पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !
सातारा नगर परिषदेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी !