अध्यात्माची कास धरून सतत साधना केली, तरच भगवंत या आपत्काळात आपले रक्षण करेल ! – मिलिंद चवंडके, नाथ संप्रदायाचे संशोधक

नगर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

मोरया मंगल कार्यालय येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित जिज्ञासू
श्री. मिलिंद चवंडके

नगर –  हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपल्याच हातात आहे. सगळीकडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण होत आहे. हिंदु संस्कृतीचा र्‍हास होत चालला आहे. पाश्चात्त्यांचे अनुकरण करणे, हे तरुण पिढीला ‘फॅशन’ वाटते; पण याचे दुष्परिणाम काय होतात ? याकडे कुणी पहात नाही. सध्याचा काळ वाईट आहे, याची पावले ओळखून सर्वांनी अध्यात्माची कास धरून सतत साधना करणे आवश्यक आहे, तरच या आपत्काळात भगवंत आपले रक्षण करेल, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक, नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी या वेळी केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. ऋग्वेद भवन, चितळे रोड या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाला ‘पंडित दीनदयाळ पतसंस्थे’चे संस्थापक आणि भाजपचे नेते वसंतशेठ लोढा, महाराष्ट्र राज्य भाजप महिला मोर्चा सचिव सौ. सुरेखा विद्दे, भाजप नगरसेवक श्री. अजय चितळे हे उपस्थित होते. सनातनच्या वतीने ‘मोरया मंगल कार्यालय’, पाईपलाईन रोड येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. पाऊस चालू असतांनाही उत्सवाचा १५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.