साधकाने साधनेच्या संदर्भात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे’ आणि ‘देवतांशी बोलणे’, यांत जाणवलेला भेद

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

सत्संगात साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधनेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सांगतात. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्या समजून घेतात आणि त्याविषयी ते साधकाला अचूक मार्गदर्शन करतात. काही प्रसंगी साधक त्यांना येत असलेल्या अनुभूती परात्पर गुरु डॉक्टरांना सांगतात. तेव्हा ते त्या अनुभूतींमागील अध्यात्मशास्त्र सांगतात आणि साधक ‘आता अध्यात्मातील कुठल्या टप्प्याला असून त्याने ‘त्या पुढे कसे जायचे ?’, यांविषयी दिशादर्शन करतात.

श्री. राम होनप

साधक परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत असलेल्या विविध सूत्रांना ते प्रसंगांनुरूप कधी गंभीर होऊन, तर कधी हसून प्रतिसाद देतात. परात्पर गुरु डॉक्टर साधकाला प्रसंगी त्याच्यातील गुण सांगतात आणि साधना करतांना कुठे चुकत असले, तर तेही प्रेमाने लक्षात आणून देतात. अशा मार्गदर्शनामुळे साधकाच्या साधनेला वेग प्राप्त होतो.

याउलट जर साधकाने त्याच्या साधनेच्या संदर्भातील अडचणी देवाला सांगितल्या, तर देव सूक्ष्म असल्याने त्यावर ‘तो प्रतिसाद कसा देत आहे ? तो आपल्याशी काय बोलत आहे ? किंवा मार्गदर्शन करत आहे ?’, हे साधकाला समजत नाही. देवाने जरी साधकाला सूक्ष्मातून मार्गदर्शन केले, तरी ते जसेच्या तसे साधकाला ग्रहण होणे महत्त्वाचे आहे आणि त्यात अनिष्ट शक्तींनी काही अडथळा आणल्यास साधकाची साधनेत दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ‘साधकाच्या जीवनात प्रत्यक्ष गुरु आणि त्यांचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे ?’, हे लक्षात येते.
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)

सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण

‘समाजामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार आणि काही संत लोकांना केवळ साधनेच्या संदर्भातील तात्त्विक भाग सांगतात; पण प्रत्यक्षात कुणीही त्यांच्याकडून साधना करवून घेत नाही. त्यामुळे समाजात आजवर काही पालट दिसून आलेले नाहीत. याउलट सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते. त्यामुळे सनातनच्या सहस्रो साधकांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक