जगातील सर्वांत प्रगत टँकविरोधी शस्त्रांपैकी एक !
नवी देहली – भारताने १२ एप्रिल या दिवशी लडाखमध्ये स्वदेशी विकसित हेलिकॉप्टरवरून ‘अँटी-टँक गाइडेड मिसाईल’ ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी घेतली. ‘डी.आर्.डी.ओ.’च्या म्हणजे ‘संरक्षण संशोधन आणि अनुसंधान संघटने’च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ‘हेलिना’ हे क्षेपणास्त्र जगातील सर्वांत प्रगत टँकविरोधी शस्त्रांपैकी एक आहे’, असेही त्यांनी सांगितले.
डी.आर्.डी.ओ., भारतीय सैन्य आणि भारतीय वायूसेना यांच्या शास्त्रज्ञांच्या पथकांनी संयुक्तपणे ही चाचणी केली. अत्याधुनिक आणि हलक्या असलेल्या हेलिकॉप्टरवरून उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या आणि ‘सिम्युलेटेड टँक’ला (टँकच्या नमुन्याला) लक्ष्य करण्यात आले. या चाचणीमुळे ‘आत्मनिर्भर भारता’च्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना मिळाल्याचे म्हटले जात आहे.
Flight test of indigenously developed helicopter launched Anti-Tank Guided Missile ‘HELINA’ carried out from Advanced Light Helicopter at high-altitude ranges along with participation of Indian Army and Indian Airforce.@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi @IAF_MCC pic.twitter.com/s1LmVTeZgy
— DRDO (@DRDO_India) April 11, 2022