पानिपत, लेण्याद्रि मंदिर आणि कार्ला येथील एकवीरा मंदिर यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती

उजवीकडून दुसऱ्यास्थानी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे – मराठ्यांच्या शौर्यगाथेच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या ‘पानिपत’ येथील स्मारकामध्ये ‘लाइट अँड साऊंड शो’ चालू करावा, इतिहासाविषयी सविस्तर माहितीपत्रिका उपलब्ध करून द्यावी, पायाभूत सुविधा पुरवाव्यात, तसेच राज्यातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्री मंदिर आणि कार्ला येथील एकवीरा मंदिर यांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पुरातत्व विभागाकडे केली आहे.

डॉ. गोर्‍हे यांनी ४ एप्रिल या दिवशी हरियाणा रोड मराठा संघटनेच्या प्रतिनिधींसह ‘पानिपत’ येथील स्मारकाची पहाणी करून शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्याविषयी त्यांनी ९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच कुरुक्षेत्र येथे मराठी भाविकांसाठी भक्त निवास बांधण्याविषयी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गोर्‍हे यांनी सांगितले.