खालापूर (रामनाथ) वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वनविभागाची कारवाई

रामनाथ (अलिबाग) – येथील खालापूर वनक्षेत्रातील मौजै कलोते मोकाशी येथील १.९ हेक्टर जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले ‘कॅम्प मॅक्स’ हे हॉटेल आणि रिसॉर्ट वनविभागाने कारवाई करून २ एप्रिल या दिवशी पाडले. पॅगोडा, स्वयंपाकघर, सामान कक्ष, बांबूच्या झोपड्या, शौचालय, ओपन थिएटर, बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट, लॉन, बाग, अंतर्गत रस्ते अशा मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले होते. (एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असतांना प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? – संपादक) अतिक्रमण करणारे जगमितसिंग सबरवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

साहाय्यक वनसंरक्षक यांनी अतिक्रमण केलेल्या भूमीचा मालकी हक्क पुराव्यांसह सिद्ध करण्यासाठी संधी दिली होती; मात्र सबरवाल यांना ते सिद्ध करता आले नाही. तसेच पुरावेही त्यांनी सादर केले नाहीत. पनवेलचे साहाय्यक वनसंरक्षक यांनी बांधकाम सात दिवसांत मोकळे करण्याचे आदेश दिले होते.