सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पाटील यांचे अन्नत्याग उपोषण !

कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडण्याचे प्रकरण !

दायित्वशून्य आणि असंवेदनशील महापालिका प्रशासन ! असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या समस्या का सोडवत नाही ? – संपादक 

कृष्णा नदीमध्ये शेरीनाल्याचे पाणी सोडले जाते याच्या निषेधार्थ अन्नत्याग उपोषण करणारे दत्ताभाऊ पाटील (गळ्यात स्कार्फ घातलेले – झोपडीत डाव्याबाजूला बसलेले)

सांगली, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगलीत गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी मिसळते. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, तसेच नदीत पोहणार्‍यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडले जाते याच्या निषेधार्थ तसेच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी यांसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पाटील यांनी अन्नत्याग उपोषण चालू केले आहे. याला नदी परिसरातील लोकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. (शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी कृष्णा नदीत मिसळू नये यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना अन्नत्याग उपोषण करावे लागते यापेक्षा प्रशासनासाठी लज्जास्पद काय असू शकते ? – संपादक)