सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा !
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी या तिथीला ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणेशलहरी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच गणेशाचा जन्म झाला ! तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पट अधिक कार्यरत असते.
जाणून घ्या ! श्री गणेशजन्माची कथा आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ, ‘चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व, काही विशिष्ट हेतूंसाठी श्री गणेशाची उपासना करतांना म्हणावयाचे मंत्र, गणरायाचे निरनिराळे अवतार आणि त्या प्रत्येक अवतारातील त्याचे नाव अन् कार्य !
श्री गणेशाविषयी अशी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या : https://www.sanatan.org/mr/shri-ganapati
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी या तिथीला म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी श्री गणेश जयंती आहे. माघ मासात येणार्या या गणेश जयंतीला ‘माघी गणेश जयंती’ही संबोधले जाते. या दिवशीचे महत्त्व, त्याचा इतिहास, तसेच जयंतीमागील गूढ आध्यात्मिक अर्थ इत्यादी श्री गणेशाशी संबंधित अद्भुत माहिती सनातन संस्थेने खालील केलेल्या ट्वीटद्वारे जाणून घ्या !
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी (४.२.२०२२) ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणेशलहरी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच श्री गणेशाचा जन्म झाला ! या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. (1/2)https://t.co/rWlA0hXwiX pic.twitter.com/ZOYOsMeLeo
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 3, 2022