पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार्‍या अत्याचारांपासून सुटका मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साहाय्य करावे ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकाची मागणी  

पाकव्याप्त काश्मीरमधील एक मोठा घटक भारताच्या बाजूने आहे. याचा लाभ उठवत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावीत ! – संपादक

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक मलिक वसीम

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमधील मलिक वसीम नावाच्या एका नागरिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. ‘येथील (पाकव्याप्त काश्मीरमधील) संपत्ती ही भारत आणि शीख यांची आहे. माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला येथील आयुक्त आणि तहसीलदार उत्तरदायी असतील. येथील प्रशासनाला मोदी सरकारने धडा शिकवावा’, अशी मागणी मलिक यांनी व्हिडिओमध्ये केली आहे. ‘माझ्या घरावर पोलिसांनी जप्ती आणली असल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय रस्त्यावर आलो आहोत’, अशी व्यथाही त्यांनी या व्हिडिओमध्ये मांडली आहे.