हुपरी येथील नागरिक पायाभूत आणि नागरी सुविधांपासून वंचित ! – नितीन काकडे, सामाजिक कार्यकर्ते

हुपरी, ८ डिसेंबर (वार्ता.) – हुपरी नगर परिषदेच्या स्थापनेपासून अनेक मालमत्तांवर भाडे मूल्यांवर आधारित कायदेशीरदृष्ट्या योग्य अशी वसुली केलेली नाही. या संदर्भात नगरपरिषदेकडे माहिती मागितली असता ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हुपरी नगर परिषदेने भाडे मूल्यावर आधारित मालमत्तांवर कर आकारणीची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया अथवा कार्यवाहीच केलेली नाही, असा संशय घेण्यास जागा आहे. ही कार्यवाही योग्य पद्धतीने न झाल्याने हुपरी येथील नागरिक पायाभूत आणि नागरी सुविधांपासून वंचित आहेत. तरी या संदर्भात सखोल अन्वेषण करून हुपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कार्यवाही करावी, अशी तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन काकडे यांनी नगरविकासमंत्री, विभागीय आयुक्त, तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.