कोरोनाची लस न घेतल्यास पेट्रोल, गॅस अन् स्वस्त धान्य मिळणार नाही ! – संभाजीनगर येथील जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

संभाजीनगर – कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणात संभाजीनगर जिल्हा राज्यात २६ व्या स्थानी आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा प्रशासनाला जाब विचारून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कठोर धोरण अवलंबले आहे. लसीची किमान एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, गॅस आणि स्वस्त धान्य मिळणार नाही, तसेच जिल्ह्यात पर्यटनस्थळांवर प्रवेश मिळणार नाही. खासगी किंवा सरकारी वाहनाने प्रवासबंदी करण्यात आली आहे. शिवाय पर्यटनस्थळांवर असलेल्या उपाहारगृहे, रिसॉर्ट आणि दुकाने येथील कर्मचार्‍यांनाही लसीकरण सक्तीचे केले आहे. ९ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात हे आदेश लागू झाले आहेत.