आता एवढीच प्रार्थना श्री गुरुराया ।

सर्व साधकांच्या श्रद्धास्थानी असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. वर्षा ठकार

भाव पुष्प १

जगणे आणि मरणे यांत असते पुसटशी रेष
जीव पालटतो कर्मानुरूप वेश,
नको ते साचवतो अन् पाहिजे ते सांडवतो
न संपणारा मार्ग सतत चालून
सुख-दुःखात अडकतो ।।
………
भाव पुष्प २

आता एकच ध्यास , या जिवाला लागू दे
हरिनाम प्रत्येक श्वासाला चिकटू दे,
आता एवढीच प्रार्थना श्री गुरुराया
तव चरणकमल माझ्या आसवांनी भिजू देत ।।
…….
भाव पुष्प ३

वानरांनी रामनाम कोरून दगड समुद्रात टाकला
तो देहभान विसरून नामात तल्लीन झाला,
दगड राममय होऊन तरंगू लागला
असा तो जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त झाला ।।
……..

आता एवढीच प्रार्थना श्री गुरुराया ।

‘परात्पर गुरुदेव, मीही दगड आहे हो ! ‘आता तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करवून घ्या आणि याच जन्मी मला मुक्त करा’, एवढीच प्रार्थना !’

– सौ. वर्षा ठकार, पुणे (२०.९.२०१७)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक