व्याख्यानासाठी प्रसिद्धीमाध्यमांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद !

‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानास प्रसिद्धीमाध्यमांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. व्याख्यानाच्या पूर्वप्रसिद्धीचे वृत्त दैनिक आणि वेब पोर्टल यांनी प्रसिद्ध केले, तर उत्तरप्रसिद्धीचे वृत्तही अनेक दैनिक, वेब पोर्टल, यू ट्यूब चॅनल यांनी प्रसिद्ध केले. यामुळे व्याख्यानाचा विषय सहस्रो जिज्ञासूंपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.

१. सोलापूर येथील साप्ताहिक ‘आपले सोलापूर’, दैनिक ‘माणदेश नगरी’, दैनिक ‘सांगोला नगरी’, दैनिक ‘माणदूत एक्सप्रेस’, महाराष्ट्र न्यूज (यू ट्यूब चॅनल), लातूर येथील दैनिक ‘सत्यमत’, बीड येथील दैनिक ‘दिव्याग्नि’ यांनी प्रसिद्धी दिली.

२. सांगली येथील दैनिक ‘ललकार’, दैनिक ‘जनमत’, दैनिक ‘केसरी’, तसेच प्रतिष्ठान न्यूज पोर्टल (वृत्त संकेतस्थळ) यांनी वृत्त प्रसिद्ध केले.

३. पुणे येथील ‘पुणे प्रहार डॉट कॉम’ या संकेतस्थळाने वृत्त प्रसिद्ध केले.

४. सातारा येथील दैनिक ‘कर्मयोगी’ वृत्तपत्राने, तर दैनिक ‘सांजवात’ या वृत्तपत्राने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले.

५. गोवा येथील दैनिक ‘लोकमत’ या वृत्तपत्राने प्रसिद्धी दिली, तर काणकोण येथील ‘सिटी केबल’ या वृत्तवाहिनीने २२ जून या दिवशी कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. ‘सिटी केबल’ या वृत्तवाहिनीची दर्शक संख्या ५ सहस्र इतकी आहे.

६. रत्नागिरी येथील ‘कोकण स्टार न्यूज’ या यू ट्यूब चॅनलने वृत्त प्रसिद्ध केले.

७. सिंधुदुर्ग येथील ‘सिंधुदुर्ग माझा न्यूज’, ‘सिंधुदुर्ग २४ तास’, ‘ब्रेकींग मालवणी’, ‘वेंगुर्ले अपडेट’ या न्यूज पोर्टलने, तसेच दैनिक ‘लोकमत’, ‘रत्नागिरी टाइम्स’, दैनिक ‘सकाळ’ यांनी प्रसिद्धी दिली.