काळ्या जादूवरील उपचारासाठी लक्षावधी पैसे उकळणार्‍या पुण्यातील धर्मांध भोंदूंविरोधात गुन्हा नोंद

गुन्हेगारी आणि फसवणूक यांत आघाडीवर असणारे धर्मांध ! 

पुणे – सतत आजारी असणार्‍या व्यक्तीला ‘तुमच्यावर घटस्फोटित पत्नीनेच काळी जादू केली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावी लागतील’, असे सांगून आर्थिक फसवणूक करणार्‍या कुतुबुद्दीन नजमी आणि हकिमउद्दीन मालेगाववाला या २ धर्मांध भोंदूबाबांवर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भोंदूबाबांनी ४ कबुतरे खरेदी करण्यास ६ लाख ८० सहस्र रुपये मागितले होते. त्यामुळे आजारी असणार्‍या व्यक्तीच्या वडिलांनी अधिकोषातून पैसे काढून दिले. या प्रकरणी अबिझर जुझर फतेपुरवाला यांनी पोलीसांकडे तक्रार केली आहे.