प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांनी रचलेली स्तोत्रे आणि त्या स्तोत्रांचे फलित

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी

१. घोरकष्टोद्धरण स्तोत्र

आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनाचे आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच (Disaster Management’s practical approach) आहे.

२. श्री दत्तमाला मंत्र

प्रतिदिन मनोभावे न्यूनतम १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते !

३. श्री दत्तात्रेय कवच

शारीरिक संरक्षणासाठी

४. श्री दत्तस्तोत्र

राग न्यून होणे, मनःशांती आणि रक्तदाबाचा विकार न्यून होणे

५. श्रीपादवल्लभस्तोत्र

देहरूपी श्री सद्गुरुप्राप्तीसाठी

६. अपराधक्षमापनस्तुति

नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र

७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र

पूर्ण वाचनाने श्री गुरुचरित्र वाचनाचे फल मिळते. (यातील मंत्र क्र. ६३ संतान भगवद्भक्त होण्यासाठी आणि मंत्र क्र. ६६ पोटदुखी न्यून होण्यासाठी आहे.)

८. श्री सप्तशतीगुरुचरित्र

घरामध्ये अखंड शांतता रहाण्यासाठी, उत्तम आरोग्य आणि मनःकामनापूर्ती यांसाठी

९. श्री दत्तलीलामृताब्धिसार

घरामध्ये अखंड शांतता रहाण्यासाठी आणि उत्तम आरोग्य अन् मनःकामनापूर्ती यांसाठी

१०. श्री दत्तमाहात्म्य

घरामध्ये अखंड शांतता रहाण्यासाठी आणि उत्तम आरोग्य अन् मनःकामनापूर्ती यांसाठी

११. वासुदेवमननसार

प्रपंचात अध्यात्म कसे साधावे ?

१२. सार्थ बालाशिषस्तोत्र

‘कुमारांना आणि कुमारिकांना दृष्ट लागू नये’, यासाठी अन् अर्भकांना ग्रहादी पीडांपासून मुक्त करणारे

१३. मंत्रात्मक श्‍लोक

जप कसा करावा ? कर्ज निवारणाचा आणि सौभाग्याचा मंत्र

१४. चाक्षुषोपनिषद

डोळ्यांचे सर्व विकार आणि चष्म्याचा क्रमांक न्यून होण्यासाठी, तसेच वंशामध्ये कुणालाही नेत्रविकार न होण्यासाठी

१५. मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्नरत्नम् ।

वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम् ॥
मामज्ञं मत्तमर्भं भवदवसुवहं वासनासर्वसंघे ।
मात पात सुतस्ते वहरहसि हरे देशिके शिष्यशिष्यम् ॥

अर्थ : सृष्टीकर्ता ब्रह्मा, जगाचा पालनकर्ता विष्णु आणि कामदेवाला मारणारे श्री शंकर, परमहंस परिव्राजकांमध्ये श्रेष्ठ श्री सदाशिवरूप, सगुण ईश्‍वर, गुरूंचे गुरु, शिष्यांना ज्ञान देणारे, हातात कमंडलू धारण करणारे श्री वासुदेवानंद सरस्वती यांना मी वंदन करतो. अज्ञानी अशा या मदोन्मत्त बालकास तुम्ही संसाररूपी दावानलातून बाहेर काढा. वासनांच्या जाळ्यात माझे अधःपतन होऊ देऊ नका. हे गुरुमाते, मी तुझा पुत्र आहे. मला शिष्यांचा शिष्य बनव.

श्री स्वामी महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला हा श्‍लोक आहे. श्री सद्गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आहे.

॥ गुरुदेव दत्त ॥’

(सौजन्य : ‘व्हॉट्सअ‍ॅप’)