श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे १ मिनिट पाहिल्यावर त्यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसतात. विदेशातही सर्वांना हे छायाचित्र दाखवण्यास सांगितले होते. तेथील काही साधकांनाही वरीलप्रमाणे जाणवले; पण काही साधकांना तसे जाणवले नाही. याविषयी सत्संग घेऊन साधकांना त्याची कारणे विचारण्यात आली. ती पुढे दिली आहेत.
१. श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर काही न जाणवण्याची साधकांनी सांगितलेली कारणे
१ अ. शिरीन चाइना, श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह आणि सौ. शरण्या देसाई : या घाईत असल्याने त्यांना तसे काही जाणवले नाही.
१ आ. अनु परशुराम : प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना आणि नामजप केला नाही. त्यामुळे त्यांना काही जाणवले नाही.
१ इ. श्री. अॅलन हार्डि : यांना श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांचे डोळे अन् ओठ हलतांना दिसले; परंतु त्यांनी ते व्यवस्थित लिहून दिले नाही.
१ ई. श्री. वाम्सीकृष्णा, सौ. वैशाली धवस, श्री. पीटर आणि श्री. दावोर : यांना श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसले; परंतु त्यांनी याचे उत्तर उशिरा पाठवले.
२. पुन्हा प्रयोग केल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे
सत्संगात शेवटी साधकांना ‘प्रयोग कसा करायचा ?’, याविषयी सांगितले. त्यांना पुन्हा प्रयोग करण्यास सांगितले. त्यांची उत्तरे/निरीक्षणे पुढे दिली आहेत.
२ अ. अनु परशुराम : ‘श्री. हान्स यांचे ओठ हलतांना दिसले. ‘ते काहीतरी सांगत आहेत’, असे जाणवले. ‘त्यांच्या डोळ्यांची हालचाल होते कि नाही ?’, हे मला कळले नाही; परंतु त्यांच्या डोळ्यांत जिवंतपणा जाणवला.’
२ आ. शिरीन चाइना
१. ‘दोन्ही बुबुळांभोवती हालचाल जाणवली.
२. दोन्ही बुबुळांभोवती पांढरा प्रकाश फिरतांना दिसला.
३. उजव्या डोळ्याची नाकाच्या दिशेने थोडीशी हालचाल होत असल्याचे जाणवले.
४. उजव्या डोळ्याची वरच्या दिशेने थोडीशी हालचाल होत होती. डोळे उघडे असतांनाची ध्यानाची स्थिती जाणवली.’
२ इ. सौ. शरण्या देसाई : ‘श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘त्यांचे ओठ हलत असून ते हसत आहेत’, असे मला दिसले. त्यांचे डोळेही हलतांना दिसून त्यांत जिवंतपणा जाणवला.’
२ ई. श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह, सौ. वैशाली धवस आणि श्री. पीटर : ‘श्री. हान्स यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसले.’
२ उ. श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी : ‘श्री. हान्स यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसले. मी त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिले. तेव्हा त्यात जिवंतपणा जाणवला. त्यांचे डोळे पारदर्शक असल्याप्रमाणे वाटले. त्यांच्या देहाभोवती चैतन्याचे कवच दिसले. त्यांच्याकडे वरून पांढरा आणि पिवळा प्रकाश येत असल्याचे जाणवले. ‘या माध्यमातून ईश्वरच त्यांच्या मनात विचार घालतो’, असे मला वाटले. त्यांच्यात बालकभाव म्हणजे ‘मी देवाचे बाळ आहे’, असा भाव असून तो व्यक्त स्वरूपात आहे’, असे वाटले.’
२ ऊ. श्री. दाव्होर : ‘श्री. हान्स यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवला. ते स्मित करत असून त्यांचे मुख हलतांना जाणवले.’
२ ए. श्री. अॅलन : ‘श्री. हान्स यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसले. त्यांच्या डोळ्यांत जिवंतपणा जाणवला, तसेच हसतांना जसे ओठ विस्तारित होतात, तसे त्यांचे ओठ विस्तारित झालेले जाणवले.’
२ ऐ. सौ. द्रगाना किस्लोव्हस्की : ‘त्यांच्या गळ्यातील स्वरयंत्राचा भाग हलतांना जाणवला.’
शिकण्याची वृत्ती असलेले आणि एखादी गोष्ट जमत नसल्यास त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणारे विदेशातील साधक !‘स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळणे म्हणजे ‘सूक्ष्मा’तील कळणे. जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म जगत्’ असे संबोधतात. साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये, तसेच अन्य काही साधकांमध्ये श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होत असल्याने प्रत्येकाच्या साधनेतील प्रगतीनुसार त्या त्या व्यक्तीला सूक्ष्म स्तरावर जाणण्याची क्षमता प्राप्त होते. सूक्ष्मातील अभ्यास ‘सूक्ष्मातील दिसणे, सूक्ष्मातून जाणवणे आणि विचार येणे’ अशा तीन स्तरांवर केला जातो. श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे १ मिनिट पाहिल्यावर त्यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसतात. विदेशातील साधकांना हे छायाचित्र दाखवण्यास सांगितले होते. त्यांतील काही जणांना आरंभी त्या छायाचित्राकडे पाहून काहीच जाणवले नाही. त्यानंतर त्यांना त्या संदर्भात कारणे विचारली असता त्यांनी स्वतःचे केलेले निरीक्षण उत्तम आहे, तसेच त्यानंतर साधकांनी छायाचित्राचा परत एकाग्रतेने अभ्यास केला असता त्यांना छायाचित्राकडे १ मिनिट पाहिल्यावर श्री. हान्स यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसले. यावरून विदेशातील साधकांची शिकण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. ‘एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही, तर त्यासाठी जिज्ञासेने परत परत प्रयत्न करणे’, हीच साधना आहे. सर्वांनाच त्यांच्याकडून शिकता येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
|