जत येथील मरगुबाई मंदिरातील दुर्घटना प्रकरणी चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !

जत (जिल्हा सांगली) – तालुक्यातील मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराच्या परिसरात पत्रा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी उमदी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. (भ्रष्टाचारी आणि निष्काळजी लोकांमुळे निष्पाप भाविकांचा प्राण जाणे, हे संतापजनक ! – संपादक)

१२ मेच्या सायंकाळी ५ च्या सुमारास मंदिरात आश्रयाला थांबलेल्या भाविकांवर भिंत कोसळली. वादळी वार्‍यामुळे शेड कोसळली असली, तरी त्यामागे निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रिक चुका असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. कोंडिबा केसकर, आप्पासो केसकर, सुनील जावीर आणि किसन यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०६, १२५ आणि १२५ (ब) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर परिसरात निकृष्ट दर्जाची पत्र्याची खोली उभारली जाणे, हे मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !