सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला

डावीकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, मध्यभागी श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि श्री दुर्गादेवीची प्रतिमा

रामनाथी (गोवा) – ‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ६ मे या दिवशी श्री चंडी होम भावपूर्ण वातावरणात पार पडला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत हा होम पार पडला. होमाचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेच्या पुरोहितांनी केले.