सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत देवघराची ३ स्तरांवर योग्य रचना केल्यावर देवघरातील दोन कप्प्यांच्या मधील पट्टीकडे बघितल्यास तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य जाणवण्यामागील कारण आणि प्रमाण यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात देवाच्या कृपेने मिळालेले ज्ञान येथे लेखबद्ध केले आहे.

१. देवघराच्या योग्य रचनेचे ३ स्तर
‘देवघराच्या २ खणांपैकी खालच्या खणामध्ये देवतांच्या सगुण-निर्गुण स्तरावरील आणि वरच्या खणामध्ये निर्गुण-सगुण स्तरावरील तत्त्वलहरी कार्यरत असतात. त्यामुळे देवघरात अनेक देवतांची चित्रे किंवा मूर्ती असल्यास त्यांची मांडणी शक्यतो देवघराच्या वरच्या भागात न करता देवघरातच करणे अधिक योग्य आहे. देवघरात अनेक देवतांची चित्रे किंवा मूर्ती असल्यास त्यांपैकी गरुड, शेषनाग, योगिनी इत्यादी कनिष्ठ देवतांना सर्वांत खालच्या खणामध्ये; वरुण, सूर्य, नवग्रह इत्यादी देवतांना मधल्या खणामध्ये आणि उच्च देवता अन् गुरु यांना सर्वांत वरच्या खणामध्ये स्थान द्यावे. अशी देवतांची खालून वर तीन स्तरांवर रचना करणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे.
मूळ प्रश्न : देवघराची नवीन मांडणी केल्यावर देवघराच्या दोन कप्प्यांच्या मधील पट्टीकडे बघितल्यास तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य का जाणवते ? त्याचे वरील आणि खालील कप्प्यांच्या तुलनेत प्रमाण किती असते ?
![]() – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराची नवीन मांडणी केल्यावर देवघराच्या दोन खणांच्या मधील पट्टीकडे बघितल्यास तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य का जाणवते ?

उत्तर :
२ अ. देवघरातील खणांमध्ये देवतांची चित्रे आणि मूर्ती असल्यामुळे सगुण तत्त्वाशी संबंधित असणारी देवतांची शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असणे : देवघराच्या खणांमध्ये देवतांची चित्रे आणि मूर्ती असल्यामुळे तेथे देवतांचे रूप अन् आकार यांच्याशी संबंधित, म्हणजेच तेजतत्त्वाशी संबंधित सगुण स्तरावरील तत्त्वलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे सगुण तत्त्वाशी संबंधित असणारी देवतांची शक्ती देवघरातील खणांमध्ये अधिक प्रमाणात कार्यरत असते.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन खणांच्या मधील पट्टीकडे बघितल्यास तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य जाणवण्यामागील कार्यकारणभाव
२ आ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील खण आणि दोन खणांमधील पट्टी यांचे कार्य अन् त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

वरील कारणांमुळे देवघराच्या दोन खणांच्या मध्ये असलेल्या पट्टीकडे बघितल्यास तिच्यात अधिक प्रमाणात चैतन्य जाणवते.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील दोन खणांच्या मधल्या पट्टीमध्ये असलेल्या चैतन्याचे प्रमाण वरील आणि खालील खणांमधील चैतन्याच्या तुलनेत किती असते ?
उत्तर : खोलीतील फरशी ही पृथ्वीतत्त्वाशी, फरशीला लागून असलेली पोकळी आपतत्त्वाशी, खोलीच्या मधली पोकळी वायुतत्त्वाशी, तर खोलीचे छत हे आकाशतत्त्वाशी संबंधित असते. त्यानुसार खोलीतील देवघराच्या विविध खणांमध्ये पंचतत्त्वांपैकी प्रत्येक तत्त्वाचे प्रमाण भिन्न भिन्न असल्यामुळे त्यातील चैतन्याचे प्रमाणही भिन्न भिन्न असते.
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन खणांच्या मध्ये असणारी पट्टी आणि वरचा खण अन् देवघराचा वरचा भाग यांच्यामध्ये असलेली पट्टी यांमध्ये कार्यरत असणारे चैतन्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरामध्ये २ खण आहेत. त्या दोन्ही खणांमध्ये देवतांची मांडणी केलेली आहे, तसेच देवघराच्या वरही काही देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराचा पहिला (खालचा) खण, दुसरा (वरचा) खण आणि देवघराचा वरचा भाग, असे देवतांची मांडणी केलेले ३ स्तर आहेत. देवघराचा पहिला खण आणि दुसरा खण यांमधील पट्टी, तसेच दुसरा खण आणि देवघराचा वरचा भाग यांमधील पट्टी, या दोन्ही पट्ट्यांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

त्यामुळे पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असणार्या चैतन्याच्या तुलनेत तेज अन् वायु या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असणार्या चैतन्याच्या लहरींचे प्रक्षेपण अधिक सहजतेने आणि वेगाने होते.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २०.१०.२०२५ आणि ते टंकलेखन करण्याची वेळ दुपारी २.५० ते ३.२५)

यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !