‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या स्थापनेच्या आधीपासून आणि संस्थेच्या स्थापनेनंतरही सहस्रो साधकांनी साधनेला आरंभ केला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी एका वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या सहस्रो साधकांना त्यांच्या प्रीतीने घडवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्यात एक सुंदर आध्यात्मिक नाते आहे. साधक गुरुदेवांकडे काही मागत नाहीत आणि गुरुदेवही साधकांना काही अल्प पडू देत नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना भरभरून दिले आहे, देत आहेत आणि येणार्या काळात त्यांचे साधकांवरील प्रेम असेच रहाणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि साधक यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरच्या सुंदर नात्याची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे ७ मे या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037382.html

५. ‘मृत्यूसुद्धा साधक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विभक्त करू शकत नाही’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला सांगणे
वर्ष २०१० मध्ये सनातन संस्थेवर बंदीचे सावट होते. त्या कालावधीत एक साधक गुरुदेवांना भेटायला गेले. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘एका ग्रंथात सांगितले आहे, ‘मृत्यूच आपल्याला विभक्त करू शकतो’; मात्र आपल्या (साधक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) संदर्भात तर मृत्यूसुद्धा आपल्याला विभक्त करू शकत नाही !’’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सांगण्याचे तात्पर्य हेच होते, ‘जरी माझ्या मृत्यूमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, तरी मी तुमच्या समवेत (साधकांसमवेत) सतत असणारच आहे.’ त्यांनी हे एका साधकाला सांगितले असले, तरी ही गोष्ट सर्व साधकांसाठीच लागू आहे. ‘मी क्षणोक्षणी तुमच्या समवेत आहे’, हेच या प्रसंगातून गुरुदेवांनी साधकांना सांगितले आहे.
६. ‘साधकांना एखाद्या सेवेचा अनुभव नसतांना केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले असल्याने साधक ती सेवा करू शकणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची साधकांवरील कृपा असणे
‘एखाद्या ठराविक क्षेत्रातील सेवेचा अनुभव नसतांना केवळ गुरुदेवांनी सांगितले आहे; म्हणून साधक ती सेवा सहजतेने करू शकत आहेत’, असे अनेक साधकांनी अनुभवले आहे. नामजपाचे ध्वनीमुद्रण करणे असो, एखाद्या देवतेचे चित्र बनवणे असो किंवा एखाद्या आश्रमाचे बांधकाम करणे असो, त्याविषयी केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले असल्याने साधक ती सेवा करू शकतात. ही त्यांची साधकांवरील अपार कृपा आहे. त्यामुळे साधकांचे शिक्षण कुठल्याही क्षेत्रातील असले, तरीही ते अन्य क्षेत्राशी संबंधित सेवा कुशलतेने करू शकतात.
७. ‘दैवी नाद ऐकू येणे’ आणि आश्रमात अन् साधकांच्या घरात ‘दैवी कण सापडणे’ आणि साधकांनी थोडेसे जरी प्रयत्न केले, तरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना भरभरून देत असणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या मनात साधकांविषयी असलेले पितृतुल्य निरपेक्ष प्रेम आणि ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा’, अशी तळमळ असल्याने ईश्वराकडून साधकांना ‘दैवी नाद ऐकू येणे आणि आश्रम अन् साधकांच्या घरात दैवी कण’ सापडणे, यांची अनुपम भेट साधकांना मिळाली आहे, तसेच साधकांनी कोणत्याही देवतेचा नामजप किंवा प्रार्थना केल्यावर त्यांना लगेचच त्या देवतेच्या संदर्भात अनुभूती येतात. याचे कारण म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा त्यामागे संकल्प असून त्यांच्यामुळे उच्च देवता साधकांना साहाय्य करत आहेत. त्यामुळेच साधक जिथे जातील, तिथे त्यांना यश आणि कीर्ती लाभत आहे. नुकतेच चालायला शिकलेले मूल कुठेही गेले, तरी आईची दृष्टी सतत त्याच्यावर असते. ते दूर असले, तरीही आई त्याला जराही त्रास पोचू देत नाही, तसेच काहीसे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि साधक यांच्यातील नाते आहे. साधकांनी थोडे जरी प्रयत्न केले, तरी साधकांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव भरभरून देतात. त्यांनी साधकांना द्यायचे काही शेष ठेवलेले नाही.
८. ‘श्रीकृष्ण आपल्या समवेत आहे’, असे गोपी अनुभवत असल्याप्रमाणे साधकही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतः समवेत असल्याचे अनुभवत असणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भात सहस्रो साधकांना अनेक अनुभूती आल्या आहेत. अल्प मतीने त्यांना आणि त्यांच्या कार्याला समजून घेणे अतिशय कठीण आहे; परंतु ‘देव कसा असतो ? त्याची प्रीती कशी असते ? तो विविध प्रसंगांत कसे सांभाळून नेतो ? प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बळ कसे देतो ?’, असे जर कुणी विचारले, तर या प्रश्नांचे एकच उत्तर ते म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ असे आहे. गुरुदेवांना अनुभवल्यानंतर ‘देव कसा असतो !’, याची प्रत्यक्ष अनुभूती सनातनच्या सहस्रो साधकांनी घेतली आहे. ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असे प्रत्येक गोपी अनुभवत होती. त्याप्रमाणे सनातनचे साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रूपी देव स्वतः समवेत असल्याची अनुभूती घेत आहेत. गुरुदेव आणि साधक यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरील नाते अतिशय सुंदर आहे. या नात्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
‘साधनेत कितीही अडथळे आले किंवा परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही आम्हा सर्व साधकांना शेवटच्या श्वासापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निरपेक्ष प्रेमाची जाण राहून कृतज्ञताभावाने साधनेचे प्रयत्न करता येऊ देत’, अशी भगवान श्रीरामाच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (समाप्त)
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !