गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील ‘सेंट टेरेसा अकॅडमी’ शाळेतील घटना
शाळेसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने
शाळेची मान्यता रहित करण्याची आणि मुख्याध्यापिकेला अटक करण्याची मागणी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – शहरातील मोदीनगर येथील संतपुरा गल्ली क्रमांक-६ मधील ‘सेंट टेरेसा अकॅडमी’ शाळेत शिकवणार्या पीटी (फिझीकल ट्रेनिंग ‘पीटी’) शिक्षिका अरुणा गोस्वामी यांनी मुख्याध्यापिका सिस्टर लूसी यांच्यावर हिंदु मुले आणि कर्मचारी यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी छळल्याचा आरोप केला आहे. विरोध केल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अरुणा गोस्वामी यांनी मोदीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून कारवाईची मागणी केली आहे. ५ मे या दिवशी हिंदु संघटनांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करत घोषणा दिल्या. या वेळी त्यांनी प्रवेशद्वारावर ‘जय श्रीराम’ लिहिले आणि हनुमानचालिसाचे पठण केले. निदर्शकांनी शाळेची मान्यता रहित करण्याची आणि मुख्याध्यापिकेला त्वरित अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती पाहता शाळेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
अरुणा गोस्वामी यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे की,
१. मी वर्ष २०१२ पासून सेंट टेरेसा अकॅडमीमध्ये ‘पीटी’ शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझा मुलगा शिव गोस्वामी हाही याच शाळेत शिकतो.
२. दोन वर्षांपूर्वी नवीन मुख्याध्यापिका सिस्टर लूसी आल्यानंतर शाळेचे वातावरण पूर्णपणे पालटले आहे. शाळेत हिंदु मुलांच्या हातातील कलावा (धार्मिक दोरा) बळजोरीने कापला जातो. प्रत्येक रविवारी गरीब हिंदु मुलांना पैशांचे आमीष दाखवून शाळेच्या बसने चर्चमध्ये नेले जाते आणि तिथे त्यांचे धर्मांतर केले जाते.
३. मुलांसमवेतच शिक्षिकांनाही सुटीनंतर चर्चमध्ये जाण्यासाठी भाग पाडले जाते. शाळेत हिंदु सण साजरे करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात पालकांशी शिवीगाळ आणि अभद्र वर्तन केले जाते.
४. ४ मे २०२६ या दिवशी मुख्याध्यापिका सिस्टर लूसी यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि हातावर गोंदवलेले ‘भगवान महादेव’ पुसून टाकण्याचा, तसेच कपाळावरील टिकली हटवण्याचा आदेश दिला. मुख्याध्यापिकेने स्पष्टपणे सांगितले की, शाळा परिसरात केवळ ख्रिश्चन धर्माचे नियम चालतील. जेव्हा मी याला विरोध केला, तेव्हा मुख्याध्यापिकेने मला त्याच दिवशी नोकरीवरून काढून टाकले.
५. मी चर्चमध्ये न गेल्यामुळे आणि कलावा न कापल्यामुळे माझा मुलगा शिव याचाही सतत मानसिक छळ करण्यात आला. त्याला वसतीगृहामध्ये ठेवण्यात आले, जिथे तो आजारी पडला. त्यानंतर त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले.
मुख्याध्यापिकेने आरोप फेटाळले
मुख्याध्यापिका सिस्टर लूसी यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या शाळेत सर्व धर्मांचा आदर केला जातो आणि सर्व धर्मांचे सण साजरे केले जातात. पीटी शिक्षिकेला मुलांच्या किंवा पालकांच्या तक्रारीवरून त्रुटी दूर करण्यासाठी एकदा-दोनदा समज नक्कीच दिली होती; मात्र त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यांनी सांगितले की, मुलाला शाळेने काढले नाही, तर त्याच्या वडिलांनीच शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !