३४ अल्पवयीन मुली बाळंत झाल्या
रुग्णालये आणि महापालिकेची आरोग्यकेंद्रे यांनी माहिती लपवली
सोलापूर – शहरातील काही रुग्णालये आणि महापालिकेची आरोग्यकेंद्रे यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या प्रसुतीची माहिती लपवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुमाने ३४ अल्पवयीन मुली बाळंत झाल्याची माहिती २ वर्षांनंतर उघड झाली आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
९ एप्रिल या दिवशी मोहोळ येथील सामाजिक संस्थेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त एम्. राजकुमार यांनी तात्काळ चौकशीच्या सूचना दिल्या. ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा’ने माहितीची पडताळणी करून थेट गुन्हे नोंद करण्यास चालू केले. विशेष म्हणजे या संदर्भात महापालिकेकडून पोलिसांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
प्राथमिक अन्वेषणात सोलापूर शहरासह ग्रामीण भाग, कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील अल्पवयीन मुलींच्या प्रसुती सोलापूरमध्ये झाल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांत मुलींचे वय १८ वर्षांखाली असल्याचे स्पष्ट असून अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलासंह पती, सासू-सासरे, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. आता गुन्हे नोंद झालेल्या सर्वांची सखोल चौकशी चालू आहे. अल्पवयीन माता बनलेल्या मुलींचा संसार चालू असला, तरी कायदा मोडल्यामुळे अल्पवयीन विवाहितेच्या पतीविरुद्ध ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हे नोंद केले जात आहेत. जेलरोड, जोडभावी पेठ आणि एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील काही दिवसांत आणखी गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे. ‘राज्य बालहक्क आयोगा’नेही या प्रकरणाची नोंद घेतली असून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांचे जबाब नोंदवून पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !