
‘विविध लेखकांनी लिहिलेल्या आध्यात्मिक विषयांच्या संदर्भातील पुस्तकांमध्ये काही भाग सामायिक असतो, तर काही भाग वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिज्ञासूंना हा वैशिष्ट्यपूर्ण भाग शोधण्यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागू नयेत अन् त्यांना एकाच ठिकाणी हे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण एकत्रित मिळावे, या उद्देशाने सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध आध्यात्मिक ग्रंथांमधील लिखाण अंतर्भूत केलेले असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
तरुणपणी आणि म्हातारपणी असलेला साधनेचा आधार
‘तरुणपणी अज्ञानामुळे वागण्या-बोलण्यात तोल जातो आणि म्हातारपणी वार्धक्यामुळे उभे राहिल्यावर तोल जातो. साधनेचा आधार असल्यास देव सगळे सांभाळून घेतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
आजारपण नाही, तर म्हातारपण !
‘वय झाले की भूक न लागणे, ‘काही करू नये, केवळ विश्रांती घ्यावी, असे वाटणे’ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे कोणत्याही आजाराची नसून ती वृद्धत्वाची आहेत. त्यामुळे औषधामुळे त्याच्यात फरक पडेल, याची अपेक्षा न ठेवता अधिकाधिक नामजप करावा. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !