
१. पत्नीचे बोलणे मनापासून ऐकत नसल्याने उभयतांमध्ये संघर्ष होणे
‘माझी पत्नी सौ. नीता सोलंकी ‘आमची कौटुंबिक परिस्थिती आणि काही अपरिहार्य कारण’ यांमुळे अनेक वर्षांपासून पुढाकार घेऊन माझ्या आईची सेवा करत आहे. माझ्या आईचे वय आणि तिचा स्वभाव यांमुळे माझ्या पत्नीला पुष्कळ अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे माझ्या पत्नीचा मनाचा संघर्ष होऊन तिच्याकडून ते व्यक्त होत होते. पूर्वी माझ्याकडून तिला होणार्या त्रासाविषयी समजून घेतले जात नसल्याने तिला उत्तर दिले जायचे. त्यामुळे काही वेळा तिच्या मनाच्या संघर्षात वाढ होत असे आणि आम्हा दोेघांमधील संघर्ष वाढत असे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची महानता

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून आध्यात्मिक स्तरावरील ऐकणे होत असल्याचे मी काही प्रसंगांत वाचले आणि अनुभवले आहे.
अ. साधकाला वाईट शक्ती त्रास देत असतांना ‘साधकांना कशा वेदना होत असतील ?’, याचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचे.
आ. आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यावर ते त्यांचा अमूल्य वेळ देऊन माझ्या पत्नीचे ऐकत असत. तेव्हा मला वाटायचे, ‘आपण त्यांचा वेळ वाया घालवतो’; मात्र आता लक्षात येते, ‘ते माझ्या पत्नीच्या अडचणी ऐकून घेत असतांना तिच्या मनातील वेदना प्रत्यक्ष अनुभवत असत आणि तिला आधार देऊन मार्गदर्शन करत असत. तेव्हा पत्नीला हलकेपणा जाणवून तिला आनंद मिळत होता.’
– आधुनिक वैद्य मनोज सोलंकी
२. पत्नीचे बोलणे मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करू लागल्याने तिच्या अडचणी लक्षात येणे आणि तिच्या मनाची स्थिती समजण्यास साहाय्य होणे, तिला हलकेपणा जाणवणे अन् उभयतांमधील संघर्ष न्यून होण्यास साहाय्य होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी पत्नी सांगत असलेले ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला तिच्या मनाची स्थिती समजायला साहाय्य होत आहे. तिच्या अडचणी समजून घ्यायला मला साहाय्य होत आहे. मी पत्नीचे बोलणे मनापासून ऐकू लागल्यावर तिला माझा आधार वाटू लागला आहे. तिला हलकेपणा जाणवत आहे. आमच्या दोघांमधील संघर्ष न्यून होण्यास साहाय्य होत आहे.
या प्रसंगातून मला शिकायला मिळाले की, ‘कधी जीवनातील काही परिस्थितीत मार्ग सापडत नसतो. तेव्हा केवळ समोरच्या व्यक्तीचे मनापासून (परिणामकारक) ऐकल्याने अडचणी सुटू शकतात.’
३. भक्तीसत्संगात ‘ऐकण्याची वृत्ती’ याविषयी मार्गदर्शन मिळाल्यानंतर ‘ऐकण्याची वृत्ती’ याविषयी झालेले चिंतन
३ अ. ‘समोरच्या व्यक्तीचे मनापासून (परिणामकारक) ऐकणे’ हा आपला जीवनातील फार महत्त्वाचा पैलू आहे. आपण दिवसभर अनेक लोकांचे ऐकत असतो. आपल्या जीवनात येणार्या अडचणी कधी कधी आपण काही न करता केवळ समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनापासून ऐकल्याने सुटतात.
३ आ. मी आधुनिक वैद्य (डॉक्टर) असल्याने मला दिवसभर रुग्णांचे बोलणे ऐकणे आवश्यक आहे. तेव्हा माझ्याकडून पुढील प्रकारचे ‘ऐकणे’ होते.
३ आ १. शारीरिक स्तरावर ऐकणे : शारीरिक स्तरावर ऐकणे, म्हणजे रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी केवळ माहिती विचारून घेणे, उदा. रुग्णांना कुठे वेदना होतात. हे विचारल्यानंतर त्यांचे बोलणे ऐकून ‘त्यांना मुतखड्याचा त्रास असू शकतो का’, असे अनुमान करू शकतो.

३ आ २. मानसिक स्तरावर ऐकणे : येथे रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून ‘त्याला आजार होण्याला त्याची मनाची स्थिती कारणीभूत आहे किंवा नाही’, हे समजू शकते.
३ आ ३. बौद्धिक स्तरावर ऐकणे : रुग्णाचे बोलणे बौद्धिक स्तरावर ऐकून त्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी चिंतन करणे, उदा. ‘रुग्णाची लक्षणे ऐकून ती लक्षणे कुठला आजार दर्शवतात ?, याविषयी ठरवणे.
३ आ ४. आध्यात्मिक स्तरावर ऐकणे : असे ऐकणे सर्वांत श्रेष्ठ आहे. येथे रुग्णाचे बोलणे ऐकत असतांना त्याची वेदना अनुभवण्याच्या प्रयत्न करणे आणि त्यावर उपाय सुचवणे.
४. आपणही समोरच्या व्यक्तीचे आध्यात्मिक स्तरावर ऐकण्याचा प्रयत्न केल्यास आपण इतरांशी जवळीक साधू शकतो. त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम निर्माण होऊ शकते आणि साधनेच्या दृष्टीकोनातून आपल्यात ‘प्रीती’ या गुणाची वृद्धी होऊ शकते.
‘भक्तीसत्संगाच्या माध्यमातून मला साधनेत नवीन सूत्रे शिकवून माझ्याकडून कृती करून घेतली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक वैद्य मनोज सोलंकी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६० वर्षे), मडगाव, गोवा. (१४.३.२०२५)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !