
सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – येथील शाहूपुरीमध्ये रहाणारे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सुधीर वसंत परचुरे यांची ९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्री. सुधीर वसंत परचुरे घरी असतांना त्यांना अज्ञात व्यक्तीचा भ्रमणभाष आला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव रमेश अधिकारी असे सांगत आपण बडोदा बँकेचे वर्ग २ चे अधिकारी असल्याचे भासवले. त्याने परचुरे यांना ‘ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे बँकेकडून आपल्याला अधिक सुविधा मिळू शकतात’, असे सांगून भ्रमणभाषवरील व्हॉट्सॲपवर पाठवलेली लिंक उघडण्यास सांगितले. परचुरे यांनी ही लिंक उघडताच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या संयुक्त खात्यामध्ये असलेले ८ लाख ९१ सहस्र रुपये अज्ञात बँक खात्यावर स्थानांतरित झाले. यामुळे परचुरे पती-पत्नीला मानसिक धक्का बसला आहे.
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट
कळंगुट येथील ‘नाझरी रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामावर कारवाई