
मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रूपाली चाकणकर आणि अशोक खरात या दोघांमध्ये १७७ वेळा भ्रमणभाषद्वारे संपर्क झाल्याची माहिती उघड केली आहे. यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरात याला १७ वेळा संपर्क केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे संपर्क नेमके कशासाठी केले ? असा थेट प्रश्न त्यांनी केला होता. यावर शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ‘अंजली दमानिया यांना अटक करून त्यांना संपर्काची माहिती कुणी दिली ? याची चौकशी करा’, अशी मागणी केली. न्याययंत्रणा चौकशी करत आहे; मात्र अंजली दमानिया या स्वतःला काय पोलीस महासंचालक समजत आहेत का ? त्यांना संपर्काची माहिती मिळते कुठून ? हे खरेतर सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली; तर त्यांच्या जिवाला धोका आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, कारण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. (राज्याच्या मोठ्या पदावरील व्यक्तीच्या संपर्काची माहिती बाहेर कोण उघड करत आहे ? उद्या राज्यातील सुरक्षाविषयक माहिती अशीच बाहेर गेली, तर धोक्याचे नाही का ? – संपादक) शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही अंजली दमानिया यांच्यावर टीका केली.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !