
डेहराडून (उत्तराखंड) – बद्रीनाथ आणि केदारनाथ धामच्या संदर्भात नवीन नियम बनवण्यात येणार आहेत. यासाठी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती लवकरच बैठक घेणार आहे. नवीन नियमांमध्ये मंदिर परिसरात भ्रमणभाषवर बंदी आणि अहिंदूंना प्रवेशबंदीचा समावेश असू शकतो. समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, जर एखादी व्यक्ती मंदिर परिसरात भ्रमणभाष घेऊन फिरतांना आढळली, तर तिचा भ्रमणभाष जप्त केला जाईल आणि तिच्यावर मोठा दंड आकारला जाईल. मंदिर परिसरात लोक व्हिडिओ बनवत असल्यामुळे ही बंदी घालण्यात येणार आहे.
समितीचे म्हणणे आहे की, देशातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये असे नियम आधीपासूनच आहेत. आता केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्येही स्वतःचे वेगळे नियम लागू केले जातील. नवीन नियमांनुसार कुणीही भ्रमणभाष वापरतांना दिसल्यास त्याला तात्काळ पकडले जाईल. यासाठी परिसराच्या आत लॉकर बनवले जातील; मात्र लॉकर कुठे असेल आणि त्याचे भाडे किती असेल, हे अजून निश्चित झालेले नाही. दोन्ही धामांच्या आत एक सीमा रेषा (बॉर्डर लाईन) निर्माण केली जाईल. मंदिर परिसराच्या आत एक सीमा क्षेत्र निश्चित केले जाईल, जिथे जाण्यापूर्वी तपासणी केली जाऊ शकते. या सीमा रेषेनंतर मंदिराचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढण्यास मनाई असेल.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण