लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे जिज्ञासूंची ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली. या बैठकीत उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘हिंदु मुलींचे लव्ह जिहादपासून रक्षण’ या दोन चळवळी यशस्वी करण्याचा निर्धार केला. या वेळी लक्ष्मणपुरी येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी या दोन्ही चळवळींची माहिती दिली. समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी ईश्वरी बळ प्राप्त करण्यासाठी साधना करण्याचे महत्त्व विशद करतांना नामजपाचे महत्त्व सांगितले. या बैठकीला हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार, आधुनिक वैद्य आणि प्रतिष्ठित यांचा समावेश होता.
क्षणचित्रे :
१. उपस्थितांनी प्रतिदिन करावयाच्या धर्माचरणाशी संबंधित कृती करण्याचा निश्चय केला.
२. पत्रकार श्री. राधेश्याम दीक्षित यांनी ‘सनातनचे ग्रंथ सर्वांनी वाचणे आवश्यक आहे’, असे आवाहन केले.
३. डॉ. शुभम शुक्ला यांनी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन २०२२’ची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली आणि ‘अधिकाधिक लोकांनी समितीशी जोडले पाहिजे’, असे सांगितले.