पुणे महापालिकेकडून २ दिवसांमध्ये १५० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध !

उद्यान, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पथ, विद्युत विभागांसमवेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांच्या निविदा काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 

पुणे येथील जुन्या वाड्यांना ‘झोपडपट्टी’ घोषित करून पुनर्विकास केल्याचा ‘एस्.आर्.ए.’चा अहवाल दडवला !

असा चुकीचा अहवाल का दिला जातो ? त्यातून कुणाचा आर्थिक लाभ होतो ? याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !

पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘सॅनिटरी नॅपकीन’चा घोटाळा !

शिंदे म्हणाले, ‘‘या व्यवहारामध्ये मनपाची २४ लाख रुपयांची हानी होत असल्याने शहरातील भाजप लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना याविषयी लेखी पत्र दिले आहे. या दोघांच्या वादातून मनपाला ‘सॅनिटरी नॅपकीन’ खरेदी करता येत नाहीत.”

पुणे येथील अलका चौकातील विज्ञापन फलक काढणार !

नियमबाह्य उभारण्यात आलेल्या विज्ञापन फलकावरील (होर्डिंग) कारवाईस स्थगिती देण्याची याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पुणे येथे गुन्हा नोंद !

महापालिकेच्या अधिकार्‍याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आदेश देऊनही पुणे शहरातील बहुमजली इमारतींवरील ‘रुफ टॉप हॉटेल्स’वर कारवाई नाही !

बहुमजली इमारतींचा लाभ घेत शहरांमध्ये ‘रुफ टॉप हॉटेल’ नावाची संकल्पना पुढे येत आहे; मात्र ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. अशा हॉटेल्सना महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्याकडून अनुमती दिली जात नाही.

पुणे महापालिकेला ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नामांकन मिळाले, तरी कचर्‍याची समस्या तशीच !

मानांकन देतांना योग्य प्रकारे पडताळणी केली जाते का ? असे असेल, तर मानांकन मिळाल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’, अशी स्थिती असेल, तर हे गंभीर आहे !

विकासआराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास पुणे महापालिकेकडून प्राधान्य !

विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने अपूर्ण रस्त्यांची सूची करण्याच्या सूचना पुणे महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत .

नाट्यगृहाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची पुणे महापालिका आयुक्तांची ग्वाही !

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कला मंदिराचे काम चालू आहे.

फेब्रुवारी संपण्यापूर्वी कामाच्या निविदा काढण्याचे पुणे आयुक्तांचे आदेश !

मार्च मासात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिकेची कामे मार्गी लागावीत, यासाठी आयुक्त विक्रमकुमार यांनी कामांचा आढावा घेतला.