प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !

‘समाजावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र त्यात सार्वजनिक संपत्तीची हानी करणे, बंद पाळणे, बस-रेल्वे पेटवून देणे इत्यादी विध्वंसक कृत्यांमुळे राष्ट्राचीच हानी होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

श्री. आनंद जाखोटिया यांना सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेली काही वाक्ये !

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी ज्या जिवांमध्ये दैवी गुणांचा समुच्चय वृद्धींगत केला आहे, ते जीव म्हणजे सनातनचे साधक !

शब्दचातुर्याने इतरांना हरवून स्वतः नामानिराळे रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना आलेल्या विविध अनुभूती आणि त्यांचा हिंदु जनजागृती समितीविषयी असलेला जिव्हाळा !

१२ ते १८ जून २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशन काळात आलेल्या अनुभूती, हिंदु जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा, तसेच साधना करतांना आलेल्या विविध अनुभूती आदींविषयी हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांतील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे … Read more

हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

‘वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’

निसर्गाचा नाश करणारा विकास सनातन धर्माला अभिप्रेत नाही !

‘धरणांमुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला जातो आणि त्यांचा अखंडितपणा नष्ट होतो. त्यामुळे मोठमोठी धरणे बांधण्यापेक्षा नदीच्या मूळप्रवाहाला प्रवाहित ठेवून कालव्यांद्वारे विविध गावांना जल मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.