साधकांच्या मनातील आध्यात्मिक इच्छा जाणून त्या पूर्ण करणारे सर्वांतर्यामी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

लहानपणापासून असलेली श्री वेंकटरमणाचा रथ ओढण्याची इच्छा मला आठवली आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली; म्हणून कृतज्ञता वाटली. ‘माझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच गुरुदेवांनी हा प्रसंग घडवला’, असे मला वाटले.

अधिवेशनाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर ‘आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे’, असे वाटून आनंद अनुभवता येणे

हा आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे. इथेच सर्व आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही !’

अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र्र अधिवेशनासाठी समाजातील लोकांनी सहजतेने अर्पण देणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हे शक्य झाल्याचे जाणवणे

आम्ही ज्या व्यक्तींना धर्मकार्यासाठी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले, त्या व्यक्ती ते सहजतेने देत होत्या. या वेळी समाजातील काही नवीन व्यक्ती जोडल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्पण घेतांना पुष्कळ आनंद मिळत होता.

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’

साधकाचा स्वभाव अंतर्ज्ञानाने अचूक ओळखून त्यानुरूप त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकाच्या मनात ‘ समाजातील एका कार्यक्रमाला जावे कि नाही ?’, असा प्रश्न होता. त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण तो साधक विविध कार्यक्रमांना जाण्यात अनावश्यक वेळ घालवत असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

प्रारंभी गुरुचरण समोर दिसून प्रार्थना होणे, नंतर आपोआपच आतून प्रार्थना होणे अन् ‘ही प्रार्थना आत्माच परमात्म्याला करत आहे’, असे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना बेळगाव येथील सौ. आशा दिलीप कागवाड यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सेवा करतांना भगवंताच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती . . .

साम्यवाद्यांचे हास्यास्पद वर्तन !

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

२२ मे २०२२ या दिवशी ८० व्या जन्मोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला. त्या वेळी केले गेलेले सूक्ष्मातील परीक्षण . . .

धर्मसत्संगांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदु दूरचित्रवाहिनीची पूर्वसिद्धता करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या सेवेतील प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांना प्रतिदिन ‘संहिता लिखाण, चित्रीकरण, संकलन आणि या संदर्भातील अन्य सेवांतील’ अनेक बारकावे शिकवले.