प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला भजनांचा कार्यक्रम पहातांना साधिकेने अनुभवलेली भावावस्था !
मी डोळे उघल्यावर ‘ते माझ्याकडे पहात आहेत’, असे दिसले. मला त्यांचे चरण दिसले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘बाबा, तुमच्या अनंत कृपेमुळे आज आम्हा सर्व साधकांना परात्पर गुरुदेव लाभले आणि त्यांच्या अनंत कृपेमुळे आम्हाला तुमची अलौकिक भजने ऐकायला मिळाली.’ असे म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करत असतांना ते माझ्याकडे पाहून हसले.