विज्ञान हे कधी समजून घेईल ?
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’
‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’
मानवाला माणुसकी न शिकवणाऱ्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणाऱ्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’
सनातनच्या आश्रमांमध्ये सर्वजण साधना करण्यासाठी ‘साधक’ या नात्याने रहात असल्यामुळे एका आश्रमात २००-२५० जण रहात असले, तरी कुणामध्येही भांडणे होत नाहीत. सर्वजण आनंदाने रहातात आणि एकमेकांना साहाय्य करतात.’
‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’
‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्ष ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’