विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाचा शोध घेणे आवश्यक !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे हे आहे फळ !

‘स्वःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्‍यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का ? हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शालेय शिक्षणाची व्यर्थता !

‘शाळेत गणित, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी किती विषयांचा जीवनात १ टक्का तरी लाभ होतो ? असे आहे, तर विद्यार्थ्यांचा वेळ ते विषय शिकवण्याऐवजी समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले