भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !

मानवाचे चिरंतन कल्याण करणारे अध्यात्मशास्त्र आणि साधना. ती हिंदु धर्माची जगाला देणगी आहे. असे असूनही भारतातील आतापर्यंतच्या एकाही राजकारण्याला त्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची, भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असेल !

‘हिंदु राष्ट्रात जाती नसतील. त्यामुळे जातीमुळे आरक्षण मिळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. राष्ट्रहितासाठी सर्व जागा गुणांवरूनच भरण्यात येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्‍ट्रात ‘स्‍वभाषाभिमान बाळगणे’, हा धर्मच असेल !

स्‍वभाषाभिमान हा राष्‍ट्राभिमानाचा पाया आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे हिंदूंचे स्‍वभाषाप्रेमासह राष्‍ट्र आणि धर्म प्रेमही नष्‍ट होत चालले आहे. शासनकर्त्‍यांच्‍या या राष्‍ट्रीय पातकाला देव क्षमा करणार नाही. – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत !

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वास्तविक ‘दूरदर्शीपणा’ !

‘स्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘कुठे ʻविश्‍वचि माझे घर’, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत नेहमीच शत्रूंकडून मार खातो, यामागील कारण !

‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले