विज्ञानाची मर्यादा !
‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘प्रथम मुसलमान, नंतर इंग्रज यांनी हिंदूंची दयनीय स्थिती केली आणि आता बहुतांश राजकीय पक्ष हिंदूंची स्थिती दयनीय करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शिक्षणासाठी जगभरातून भारतात येतात, असा एकच विषय आहे आणि तो म्हणजे मानवाचे चिरंतन कल्याण करणारे अध्यात्मशास्त्र आणि साधना. ती हिंदु धर्माची जगाला देणगी आहे. असे असूनही भारतातील आतापर्यंतच्या एकाही राजकारण्याला त्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची, भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्म देहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले