देवाच्या कृपेचे अद्वितीय महत्त्व !
‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात. आधुनिक विज्ञानाला यासंदर्भात काहीच माहिती नाही. याउलट अध्यात्मशास्त्र यासंदर्भात परिपूर्ण माहिती देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आधुनिक विज्ञान निरनिराळ्या ग्रहांचे केवळ पृथ्वीपासूनचे अंतर आणि त्याची भौगोलिक स्थिती एवढेच सांगते. याउलट ज्योतिषशास्त्र ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम, अनिष्ट परिणाम टाळावयाचे उपाय इत्यादी सर्व सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘संत सांगतात ते सर्व खोटे’, असे म्हणणे, हे एखाद्या बालवाडीतील मुलाने एखाद्या विषयात ‘डॉक्टरेट’ केलेल्याला ‘तू सांगतोस ते सर्व खोटे आहे’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पुन्हा जन्म नको’ किंवा ‘भक्ती करण्यासाठी अनेक जन्म मिळोत’, असे वाटणे या दोन्ही स्वेच्छा झाल्या. यांचा पुढचा टप्पा म्हणजे ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो’, असे वाटणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले