बुद्धीच्या स्तरावरील विज्ञान आणि बुद्धीपलीकडील अध्यात्म !

‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इतर धर्मीय आणि हिंदू यांच्या ध्येयातील भेद !

‘इतर धर्मियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व !

‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत – बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश !

‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी प्रतिदिन कार्यरत रहा !

‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उमेदवारांना मतांची भीक का मागावी लागते ?

‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही काही वर्षांनी पालटत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांच्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अद्वितीयत्व !

‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७५ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले