स्त्रीरक्षणाच्या दृष्टीने ‘हिंदु’ उपाय !
‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अनेक जण ‘त्याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्यामध्ये काय कमी आहे की, ज्यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्यक असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)
हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एका तरी शिक्षणसम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले