हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांचे महत्त्व !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वास्तविक रंगभूषा (मेक-अप) !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे शेतकरी, तर कुठे सरकारी कर्मचारी !

‘शेतकर्‍यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनाविहीन पोलिसांचे कर्तृत्व !

‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे !

. . . गुन्हे होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजे साधना शिकवली पाहिजे. हल्ली हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यात आश्चर्य ते काय !

‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राचा झेंडा हा भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले